Tuesday, May 12, 2026

बालविवाह मुक्तीसाठी 198 गावांचा पुढाकार

गावागावांत जनजागृती मोहीम राबविणे सुरू
गोंदिया : बालविवाहमुक्त भारत मोहिमेचा एक भाग म्हणून इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीमार्फत जिल्ह्यातील 198 गावांनी बालविवाह मुक्तिसाठी पुढाकार घेऊन गावात जनजागृती केली. जिल्ह्यातील 198 गावांमध्ये बालविवाह मुक्तीची जनाजगृती करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्व वयोगटातील, सर्व जाती-धर्मातील महिला, मुले अशा लाखो लोकांनी शपथ घेतली. बालविवाहाला पाठिंबा देणार नाही आणि खपवून घेणार नाही, अशी शपथ गावागावांत घेण्यात आली. इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर यांनी बालविवाह हा एक गुन्हा आहे, असे म्हटले आहे. महाराष्ट्र नागरी समाज आणि सरकारने राज्य बालविवाहमुक्त करण्यासाठी दाखविलेल्या बांधिलकीमुळे लवकरच बालविवाह होणार नाहीत. जिथे मुलांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल. बालविवाहमुक्त गोंदिया जिल्ह्यासाठी इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, कार्यक्रम समन्वय अमित बेलेकर, समन्वयक पूर्णप्रकाश कुथेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कम्युनिटी सोशल वर्कर दीपमाला भालेराव, अमोल पानतावणे, दुर्गेश भगत, संतकला रहांगडाले, पृथ्वीराज वालदे, भाऊराव राऊत, पुष्पा रहांगडाले, पौर्णिमा शहारे, भाग्यश्री ठाकरे, अनिता ठाकरे, ज्योती ठाकरे, बिंदेश्वरी मलिक, कुलदीप खोब्रागडे, किरण फुले, डिम्पल भरडे हे प्रयत्नरत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular