गोंदिया : नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी- अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन 31 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल मध्ये पार पडले.
डिसेंबर-2024 मध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी- मंत्रालयीन स्टाफ मधील श्रेणी पोलीस उप-निरीक्षक अनिरुध्द प्रल्हाद रामटेके, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक राजेश तुलाराम शहारे, प्रमुख लिपीक श्रीमती मिरा संभाजी कुळसंगे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, मंत्रालयीन यांना शॉल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, देवुन त्यांचे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील भावी आयुष्याच्या प्रवासात शूभेच्छा देण्यात आल्यात. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक गोरख भामरे, प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह), नंदिनी चानपुरकर तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार मंत्रालयीन स्टॉफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, मानव संसाधन शाखा, गोंदिया, यांनी केले. यशस्वीतेसाठी कल्याण शाखा येथील रामेश्वर पिपरेवार, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य यांनी सहकार्य केले.





