Monday, May 25, 2026

नववर्षाच्या मुहूर्तावर हरविलेल्या मोबाईल मूळ मालकांना केले परत

रावणवाडी पोलिसांची प्रशंसनीय कामगीरी
गोंदिया : रावणवाडी हद्दीतील नागरिकांचे हरविलेल्या मोबाईलचा तांत्रीक पध्दतीने शोध घेवून नववर्षाच्या शुभ मुहुर्तावर आज बुधवार, 1 जानेवारी रोजी पोलिसांनी मूळ मालकांना परत. रावणवाडी पोलिसांनी परत केलेल्या ह्या 12 महागडे मोबाईलची किमती 1 लाख 25 हजार रुपये आहे.
रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे महागडे मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे रावणवाडी पोलीस ठाणेचे ठाणेदार वैभव पवार, पोलीस निरीक्षक यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले. तर हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते. या अनुषंगाने रावणवाडी पोलीस ठाणेतील पथक यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CEIR) या अप्लीकेशनवर हरविलेले मोबाईलचे अर्ज अपलोड केले. पथकाने रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीचे हरविलेले एकुण 12 महागडे मोबाईल शास्त्रोक्त तांत्रीकशुद्ध पध्दत व बुध्दीकौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने शोधुन काढले. सदर मोबाईल नवंवर्षाच्या शुभ मुहुर्तावर 1 जानेवारी 2025 रोजी पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेत. मोबाईल मालकांना हरविलेले मोबाइल हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत होवून समाधान दिसत होते. पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कामगीरी पोलीस अधीक्षक, गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावणवाडी चे पो.नि. वैभव पवार, अंमलदार पो. ना. महेंद्र कटरे, पो.शि. रजनिकांत बोपचे, तसेच तांत्रीक सेल गोंदिया येथील पोलीस अधिकारी- अंमलदारांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular