Wednesday, April 29, 2026

स्वतःच्या रायफलने गोळी झाडून पोलीस हवालदाराची आत्महत्या

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जवळील धाबेपवणी पोलीस ठाणेत कार्यरत पोलीस हवालदाराने स्वतःच्या सर्विस रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. जयराम कारू कोरेटी (वय ५०, रा. शंभूटोला/ कडीकसा, तालुका देवरी जिल्हा गोंदिया, बक्कल क्रमांक २४) असे आहे. जयराम याने स्वतःच्या AK 47 रायफलने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समजते. ते पोलीस हवालदार या पदावर धाबेपवनी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तूर्तास आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घटनेचा तपास नवेगावबांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता चापले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular