गोंदिया : गोंदिया रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल असलेला आरोपी मागील 5 वर्षांपासून फरार होता. या आरोपीला आरपीएफने बिहार पोलिसांच्या मदतीने ताब्यात नेपालच्या सीमेलगत असलेल्या अत्यंत दुर्गम भागातून ताब्यात घेतले. निजामुद्दीन शेख फरमुद्दिन शेख (वय 50, रा. शिवगंज बालुवडी पोस्ट खोदागंज ठाणा बहादुरगंज जिल्हा किशनगंज, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.
गोंदिया रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रं न 232/2019 कलम 328, 379 भांदवि मधील आरोपी निजामुद्दीन शेख फरमुद्दिन शेख हा मागील 5 वर्षापासुन फरार होता. गोंदिया रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत होता. मात्र, हा आरोपी नेपालच्या सीमेलगत भागात असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. दरम्यान, बिहार पोलिसांच्या मदतीने आरोपीला नेपालच्या सीमेलगत असलेल्या अत्यंत दुर्गम भागातून पकडून योग्य कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रियंका नारनवरे सो. लोहमार्ग नागपुर, पोलीस उपअधीक्षक दत्ताराम राठौर, उपविभागिय अधिकारी पाडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रेल्वे पोलीस ठाणे सपोनि (API) प्रतिभा राउत, विनोद खोब्रागडे, पोलीस अंमलदार धिरेद्र कटुके यांनी केली.





