गोंदिया : गोंदिया- भंडारा जिल्ह्याचे शिक्षणमहर्षि स्व. मनोहरभाई पटेल यांची ११९ वी जयंती तालुक्यातील एकोडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी राजेश (राजु) कटरे होते तर जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े व अश्विनी रविकुमार ( बंटी ) पटले प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी व उपस्थितांनी शिक्षणमहर्षि स्व. मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुण अभिवादन केले. यावेळी उपसरपंच संदिप कुर्वे, हर्षवर्धन मेश्राम, धर्मेन्द्र कनोजे, शशिकुमार मेश्राम, भुवन मेश्राम, पत्रकार आरिफ़ पठान, शैलेश सहारे, नानाजी बिसेन, आकाश उईके, नंदकिशोर नेवारे, जितेंद्र भोयर, भीमराव झाडे, बालु भदाडे, हरिशंकर लांजेवारे, जितेंद्र लांजेवारे, दिपक रोकडे, मयुर रिणायत, श्रावण पटले, बालु वडीचार, नितेश डुंडे, लोकेश डुंडे, गोलु असाठी, बंटी रिणायत, पुरणलाल बिसेन, गोंदिया- तिरोडा विधानसभा क्षेत्राचे मिडिया प्रमुख राजेशकुमार तायवाडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.





