Sunday, January 18, 2026
spot_img

नवीन न्यायालय इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी लेझीम पथकाचे उत्कृष्ठ सादरीकरण

देवरी, (गोंदिया) : देवरी येथील न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्‌घाटन शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या प्रसंगी पाहुन्यांच्या स्वागतासाठी बाबुराव मडावी विद्यालय, देवरीच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाचे आदिवासी वेशभुषेत सुंदर सादरीकरण करण्यात आले. आदिवासी वेशभूषेत लेझीम पथकाच्या नृत्य करणा-या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मंत्रमुग्ध करुन लक्ष वेधुन घेतले. देवरी वासीयांनी त्यांचे गोड कौतुक केले. या कार्यात शाळेचे मुख्याध्यापक आय. एम. पटले व संस्था सचिव, यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सादरीकरण उत्कृष्ठ होण्यासाठी शाळेचे शिक्षक व्ही. जी. मुंढे व कु. एस.एस. वासनिक यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular