Saturday, April 18, 2026
spot_img

ग्रंथमित्र डॉ. श्रावण उके यांच्याकडून तालुका वकील संघास एक लाख रुपयांचे दान

देवरी, (गोंदिया) : देवरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालच्या नुतन ईमारतीचे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालय नई दिल्लीचे न्यायमुर्ती भुषण रा. गवई यांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी देवरी येथील जेष्ठ अधिवक्ता, राष्ट्र भाषा रत्न, एम.ए. (डॉ. आंबेडकर विचारधारा), ग्रंथमित्र (महाराष्ट्र शासन) मुंबई तथा डॉ. आंबेडकर फेलोशिप दिल्ली पुरस्काराने सन्मानित एड. श्रावण उके यांनी देवरी येथील वकिल संघास तालुका बार असोशिएशन यांना 1 लाख रूपयाचे कायम मुदती ठेव प्रमाणपत्र दान केले. या प्रित्यर्थ एड.डॉ. श्रावण उके व त्यांची पत्नी शारदा श्रावण उके यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करून मान्यवर न्यायाधिशांच्या व गोंदियाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश राजेश न. जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हे कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अशोक आराधे, मुंबई उच्च न्यायालयचे न्यायमुर्ती नितीन सांबरे यांच्या उपस्थितीत, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र चांदवाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी गोंदियाचे न्यायाधिश राजेश न. जोशी, देवरी येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सुलभा चरडे, देवरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष एड. प्रशांत संगिडवार आदी दीच्या प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन न्याय. प्राजक्ता ढाणे व तेजस्वी गवई यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular