Sunday, January 18, 2026
spot_img

नवाटोला गावाजवळ ट्रक जळून खाक; 28 लाखांचा नुकसान

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील नवाटोला गावाजवळ एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवार, 28 फेब्रुवारी रोजी दुपारीच्या सुमारास घडली. या आगीत ट्रक जळून खाक झाल्याने मालकाचे 28 लाख रुपयांचा नुकसान झाला.
रायपूर ते गोंदियाकडे ट्रक क्रमांक MH 40– BL8001 टाटा कंपनीचा ट्रक स्वतः चालक आणि मालक मिथुन शामकुवर नागपुरे हे चालवत होते. अचानक सालेकसा पासून 9 किलोमीटर अंतरावर नवाटोला गावाजवळ अचानक ब्रेक लायनर मध्ये जाम झाल्यामुळे समस्या निर्माण होऊन चाक गरम झाले आणि टायरने आग पकडली. त्या ट्रकमध्ये पशु आहार वाहून नेल्या जात होता. ही दुर्घटना 28 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून ३० मिनिटांनी घडली. जवळपास साडेआठ लाख रुपयाच्या मालाचे नुकसान झाले. तसेच ट्रकची किंमत जवळपास 20 लाख रुपयांचा असल्याचे मालकाने सांगितले. चालक आणि मालक हा राहणार सावरी तालुका गोंदिया येथील रहिवासी असून, तशी तक्रार पोलीस स्टेशन सालेकसा येथे नोंदविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular