देवरी येथे कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
देवरी, (गोंदिया) : कांग्रेस पक्ष सत्तेत नसेल तरी मी वर्तमान खासदार आहे. कोणतेही समस्या असेल त्या समस्यांचा हल करण्यासाठी घाबरण्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला गरज नाही. कांग्रेस कार्यकर्तांनी पक्ष मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागा. मी तुमच्या पाठीसी खंबीर पणाने उभा आहे, असे प्रतिपादन गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी देवरी तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत व्यक्त केले.
देवरी येथील शासकिय विश्रामगृहात देवरी तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने सोमवार रोजी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची अध्यक्षता या क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी केली.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया,देवरी तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य संदिप भाटिया, जि.प.सदस्य उषाताई शहारे, राधीकाताई धरमगुळे, पं.स. सदस्य रंजीत कासम,प्रल्हाद सलामे,भारतीताई सलामे, महिला तालुकाध्यक्ष सुनंदाताई बहेकार, महामंत्री राजेश चांदेवार, वरिष्ठ कार्यकर्ता चैनसिंग मडावी, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष सोनू नेताम, युवक नेते ऍड. दुशांत किरसान, मोतीलाल पिहदे, सावंतबापू राउत, माजी पं.स.सदस्य रामेश्वर बहेकार, नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया,मोहन डोंगरे, शहराध्यक्ष कुलदिप गुप्ता,माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके,सुषमाताई घरत यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकित पक्ष संगठन कशाप्रकारे बळकट करावी आणि समोर येणा-या निवडणूकीत कशाप्रकारे काम करूण पक्षाला यश मिळेल या विषयावर चर्चा करण्यात आले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदिप भाटिया मांडले. संचालन अमित तरजुले यांनी केले तर आभार ओमप्रकाश रामटेके यांनी मानले.





