Wednesday, January 21, 2026
spot_img

शाळेत चोरी करणारे तिघे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

गोंदिया : दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रायपूर येथील हायस्कूलच्या वर्गखोलीचे दाराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून साहित्य हस्तगत केला आहे.
सविस्तर असे की, गोंदिया तालुक्यातील रायपूर येथील लक्ष्मीबाई टेंंभरे हायस्कूलचे मुख्याध्यापक भूनेश्वर गेंदलाल बिसेन, (रा. शिवटोला तांडा, ह. मु. रायपुर, तालुका जिल्हा- गोंदिया) यांनी दवनीवाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिनांक 5 एप्रिल 2025 चे 12.30 वा. ते दि. 7 एप्रिल 2025 च्या 8.00 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यानी लक्ष्मीबाई टेभरे हायस्कुल, रायपुर येथील शाळेचे कार्यालयाच्या साठा रूमचे व वर्गखोलीचे कुलुप तोडुन आत प्रवेश केले. दरम्यान शाळेचे सुरक्षेकामी लावलेले दहुआ कंपनी 02 बुलेट कॅमेरा, डी.वी.आर तसेच तांदुळ 200 किलो, इंडियन गॅस हंडा जर्मन गंजी 3 नग, 10 लिटर सोयाबिन तेल, 14 किलो वटाणा असा एकुण किंमती 15,100/- रू.चा मुद्देमाल चोरून नेले.फिर्यादीचे रिपोर्टवरून पो. स्टे. दवानीवाडा येथे अपराध क्र. 112/2025 कलम 303(2), 331 (4), 305 (इ) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर दवनीवाडा पोलिसांंसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरु केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनोज तेजु उईके (वय 27), आशिक बिरटलाल बागडे (वय 26) दोन्ही राहणार बलमाटोला ता. जि. गोदिया आणि सुरज नामदेव नेवारे (वय 30 रा. देवरी ह.मु. रायपुर ता. जि. गोंदिया) या तिघांना गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेऊन सखोल चौकशी विचारपूस केली असता तिघांनिही चोरी केल्याचे कबूल केले. तिघांनाही गुन्ह्यात अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल साहित्य किंमती 15,100/- रुपयांचे हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले.आरोपींना पोलीस ठाणे दवानीवाडा पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया दवानीवाडा पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांचे निर्देश सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक, म.पो.उप.नि. वनिता सायकर,अंमलदार रियाज शेख, सोमू तूरकर , संतोष केदार, दुर्गेश पाटील, घनश्याम कुंभलवार यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular