गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे महागडे मोबाईल हरविले होते. या हरवलेल्या मोबाइलांच्या शोध घेऊन वेगवेगळ्या कंपनीचे 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे 13 मोबाईल बुधवार, 9 एप्रिल रोजी मूळ मालकांना रावणवाडी पोलिसांनी परत केले.
रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे महागडे मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारीचे अनुषंगाने वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे रावणवाडी पोलीस ठाणेचे ठाणेदार वैभव पवार यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन करून हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते. या अनुषंगाने पोलीस ठाणे रावणवाडी येथील पोलीस पथक यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CEIR) या अप्लीकेशनवर हरविलेले मोबाईलचे अर्ज अपलोड करुन पथकाने रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीचे हरविलेले एकूण 13 महागडे मोबाईल शास्त्रोक्त तांत्रीकशुद्ध पध्दत व बुध्दीकौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने शोधुन काढले. सदरचे मोबाईल आज 9 एप्रिल 2025 रोजी रावणवाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेत. मोबाईल मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत होवून समाधान दिसत होते. पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे. ही कामगीरी गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावणवाडीचे पो.नि. वैभव पवार, पो.शि. रजनिकांत बोपचे, तसेच तांत्रीक सेल गोंदिया येथील पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, अंमलदार संजू मारवाडे, योगेश रहीले, रोशन येरणे यांनी केली.





