Wednesday, January 21, 2026
spot_img

देवरी येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

देवरी, (गोंदिया) : देवरी नगरपंचायतच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवार, 5 जून रोजी शहरातील नगरपंचायत उद्यानामध्ये करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच पर्यावरण व प्लॉस्टीक बंदीची प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी नगरपंचायतचे अध्यक्ष संजू उईके यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमात नगरसेविका कौशल्याबाई कुंभरे, पिंकी कटकवार, तनुजा भलावी, नगरसेवक संजय दरवडे, रितेश अग्रवाल, तसेच नगरपंचायतचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी उद्यानामध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचे महत्व अधोरेखित करत उपस्थित सर्वांनी अधिकाधिक वृक्ष लावण्याचे व त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता पर्यावरणाचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देऊन करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular