Tuesday, March 10, 2026
spot_img

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालयात आरोग्य तपासणी शिबीर

गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिन च्या अनुषंगाने एनसीडी जनजागृती अभियानाचे आयोजन 17 मे 2025 ते 16 जून 2025 पर्यंत संपूर्ण महिनाभर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांच्या कल्पक विचारातुन सोमवार, 16 जुन रोजी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक गोंदिया येथील कार्यालयात आरोग्य शिबीर पार पडले.
शिबिरात राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासणी करण्यात आली.फिजिओथेरपिस्ट डॉ. कांचन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांना व्यायामाचे महत्त्व, आरोग्यदायी आहार, तसेच तनावमुक्त जीवनशैली याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनम जाधव यांनी, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगून, नियोजनबद्ध वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिला. यासाठी स्टाफ नर्स आरती लिल्हारे यांचे सहकार्य लाभले. सदर तपासणीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे असे होते. यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जनजागृती पोम्पलेट वाटप करुन जनजागृती करण्यात आले. या शिबिराच्या व्यवस्थापनासाठी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालयातील दुय्यम निरीक्षक धीरज सव्वालाखे, शैलेंद्र डिबे, शैलेश तऱ्हाटे, अतुल बनसोड, राजकुमार सोमबर्से, जितेंद्र भोंडे, वीणा फुले, सुनील पुंडे, सुनील ढोमणे, सुशील बोलणे यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular