गोंदिया : आमगाव तालुक्यातील रिसामा गावात नवीन वसाहतीच निर्माण होत असतााना कॉलोनीमध्ये आगमनाकरीता कच्चे रस्ते असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत हॊता. त्यामुळे या परिसरात रस्ता बांधकामाची मागणी खासदार प्रफुल पटेल व माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्याकडे करण्यात आली होती. त्या मागणीकडे लक्ष देत नागरी सेवा सुविधेअंतर्गत 10 लाख रुपये मंजूर करुन सदर रस्ता खड़िकरण बांधकामाचे भूमिपूजन जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती टिकाराम मेंढे, आमगाव राकाँपा अध्यक्ष कमलबापू बहेकार, रवि क्षिरसागर, राजेश भक्तवर्ती, रमन डेकाटे, प्रमोद शिवनकर, अनिल शर्मा, सुभाष येवलकर, धनीराम बिसेन, संतोष श्रीखंडे, पियुष झा, गुड्डू मेंढे, ऋषि शर्मा, रिसामा येथील हिरासिंह कनपुरिया, सुरेश डोंगरे, पंचाराम मडावी, दिनेश वलथरे, भुते, दिलीप चंदेल, अशोक वर्गणंटवार, टुंडीलाल गौतम, टेकचंद कटरे, मनिषा कनपुरिया, डोंगरे आदी उपस्थित होते.





