Monday, April 13, 2026
spot_img

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 4 ते 5 जणांचा चावा; श्रीनगरातील घटना

परिसरात भीतीचे वातावरण
गोंदिया : शहरातील श्रीनगर मालवीय शाळा समोरील गल्लीतील एका पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरातील एका मुलासह 4 ते 5 जणांचा चावा घेऊन जखमी केला. ही घटना शनिवारी घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषद प्रशासनाने अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील सर्वच परिसर, कॉलोनी किंवा गल्ली (मोहल्ला) येथे भटक्या कुत्रे नाही. यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्यांवर कळप बसून असते. अनेकवेळा तर हे मोकाट कुत्रे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक, दुचाकी चालकांचे मागे धावून चावा घेतात. अश्या अनेक घटना शहरात घडली असून त्यांची दहशत कायम आहे. मात्र यानंतरही शहर प्रशासन याकडे लक्ष देत नाही. या कुत्र्यांची संख्या नियंत्रणासाठी कोणतीही प्रभावी पावले उचलली गेली नाहीत तर ती नागरिकांसाठी एक मोठी समस्या बनेल. असाच प्रकार शहरातील श्रीनगर, मालवीय शाळाजवळील माजी नगरसेविका आशाताई पाटील यांच्या घराजवळ घडला. परिसरातील एका पिसाडलेल्या कुत्र्याने 4 ते 5 जणांचा चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यांच्या घरच्या लोकांनी वेळ न गमवता जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र, श्रीनगरात हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, लहान मुले घराबाहेर जाण्यास टाळाटाळ करत आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जखमींमध्ये यांचा समावेश….
श्रीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने लहान पासून तर वयोवृद्ध व्यक्तीचा चावा घेवून त्यांना जखमी केला. यात शौर्य रविंद्र चौरीवार (वय 9), मूलचंद चौरीवार (वय 70), सागर आसवानी (वय 17), शुभांगी दोनोडे यांचा सह इतर 2 ते 3 लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 9 वर्षीय शौर्य रविंद्र चौरीवार हा गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील असून तो आपल्या मोठे वडिलांकडे उन्हाळ्याच्या सुटीत आला आहे. मात्र, तो घरासमोर खेळत असताना अचानक कुत्र्याने चावा घेऊन त्याला जखमी केला.

या परिसरातील कुत्रे ‘डेंजर’…
शहरातील श्रीनगर, माताटोली, गणेशनगर, सिव्हिल लाइन, रामनगर, संजय नगर, रेलटोली, मटन मार्केट, सिंधी कालोनी, रेलवे कालोनी, रेलवे स्टेशन सह आदि परिसरात या भटक्या कुत्रे कळपमध्ये बसून असतात. यांच्या पासून नागरिकांना भीती लागते. शहरातील मटन मार्केट परिसरातून रात्री 10 ते 11 वाजेनंतर ये-जा करणे म्हणजे जीव धोक्यात टाकणे असते, ते मात्र येथील भटक्या कुत्र्यांमुळे. रात्री येथून आवागमन केल्यास कुत्रे मागे धावतात. त्यामुळे शहरातील सर्वात जास्त ‘डेंजर’ कुत्रे मटन मार्केट परिसरातील आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular