Monday, April 13, 2026
spot_img

सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

रानमेवा पार्कला भेट देऊन वृक्षारोपण
गोंदिया : सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा गिरोला, ता. सालेकसा येथे आज जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी भेट देऊन ग्रामसभेच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी वनहक्क संलग्न ग्रामसभा कार्य, तलाव विकास व मत्स्यपालन, तसेच वन संवर्धन व व्यवस्थापन आराखड्यांवर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.
ग्रामसभा गिरोला यांनी सामुदायिक वन संसाधन (CFR) अंतर्गत उभारलेल्या रानमेवा पार्क प्रकल्पाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. त्यांनी स्वतः या ठिकाणी रोप लावून पर्यावरण संवर्धनास हातभार लावला. CFR संदर्भातील जिल्हाधिकारी यांची सकारात्मक भूमिका लक्षात घेता, ग्रामसभेच्या कार्यास गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी गिरोला येथील सरपंच मेंढे, सालेकसा तालुक्यातील 10 ग्रामसभांचे पदाधिकारी, प्रकल्प अधिकारी (देवरी) उमेश काशीद आणि तहसीलदार कोंडागुर्ले प्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या लोकाभिमुख भूमिकेचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करत कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular