Monday, September 14, 2026
spot_img
spot_img
spot_img

भरदुपारी वाघाचा मुक्त वावर, साकरीटोला-अंजोरा मार्गावर खळबळ; रेस्क्यू पथकाने वाघाला केले जेरबंद

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील साकरीटाेला-अंजोरा मार्गावर शुक्रवारी (दि.२०) दुपारी १ वाजताच्या सुमारास एक पट्टेदार वाघ आढळला. पाच ते दहा मिनिटे या मार्गावर या वाघाचा मुक्त वावर होता. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर या वाघाने रस्त्यालगत असलेल्या कालव्याकडे धाव घेतली. गावकऱ्यांची लगेच याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून वाघाला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या. नंतर रेस्क्यू पथकाने वाघाला जेरबंद करुन नवेगावबांध येथे पाठविण्यात आले.

सालेकसा तालुक्यातील साकरीटाेला-अंजोरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर असल्याची माहिती आहे. या वाघाने तीन ते चार जनावरांची शिकार सुध्दा केली. यामुळे या परिसरातील पशुपालक आणि गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. शुक्रवारी (दि.२०) दुपारी १ वाजताच्या सुमारास साकरीटोला-अंजोरा मार्गावर हा पट्टेदार वाघ रस्ता पार करीत असताना गावकऱ्यांना आढळला. भर दुपारी वाघाचा रस्त्याचा मुक्त वावर पाहुन गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. गावकऱ्यांनी लगेच याची माहिती आमगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पाेहचले आहे व रेस्क्यू पथकाने वाघाला जेरबंद करुन नवेगावबांध येथे पाठविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular