Sunday, January 18, 2026
spot_img

पाणी तपासणी प्रयोगशाळेला जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांची भेट

गोंदिया : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होतात. ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध पाणी निर्जंतूक करून पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 16 जुन ते 31 जुलै या दरम्यान “स्टॉप डायरिया” अभियान राबविण्यात येत असल्याचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ निरंजन अग्रवाल यांनी म्हटले आहे. “स्टॉप डायरिया” अभियान अंतर्गत ग्रामीण जनतेला पावसाळ्यात शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने दि.17 जून रोजी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यातील पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट देवुन होत असलेल्या कामाची पाहणी केली. भेटी दरम्यान जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. तनया चौधरी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी भाग्यश्री सोनी, जिल्हा परिषदेचे जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ मुकेश त्रिपाठी उपस्थित होते. भेटी दरम्यान स्त्रोतपासून ते पाणी शुद्धीकरण प्रकल्प किंवा जलशुद्धीकरण केंद्र व घरातील नळ पर्यंत ग्रामस्थाना शुद्ध पाणी मिळणे बाबत आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश यावेळी दिले. आरोग्य संस्थेमार्फत प्रयोगशाळेत पाणी नमुना तपासणी येत असतात ते जास्त दिवस विलंब होणार नाही याबाबत कार्यवाही करावी. प्रयोगशाळेत होणार्या अडचणीची माहीती घेतली.प्रयोगशाळेत दूषित पाणी नमूने आढळल्यानंतर संबधित आरोग्य संस्था व तालुका आरोग्य अधिकारी यांना तात्काळ सुचना देण्याचे निर्देश यावेळी दिले.त्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी काही जलसुरक्षक यांची प्रत्यक्ष भेट देवुन त्यांच्या अडचणीची माहीती घेतली. जिल्हा प्रयोगशाळेतील अनुजैविक तज्ञ भारती पटले यांच्याशी पाणी नमूने तपासणी बाबत चर्चा करण्यात आली.कोणत्याही ठिकाणी दूषित पाणी मुळे जलजन्य साथरोग होणार नाही या बाबत प्रतिबंधातमक कार्यवाही बाबत सुचित यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular