Sunday, January 18, 2026
spot_img

फार्महाउसमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; गोमाटोला बोदा येथील घटना, आरोपीला अटक

गोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोमाटोला बोदा गाव परिसरातील एका फार्महाउसवर एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आली. ही घटना बुधवार, २५ जून रोजी रात्रीला घडली. या प्रकरणात आरोपी लोमेश्वर सुरजलाल पारधी याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला ही लोमेश्वरच्या फार्महाउसवर काही वर्षापासून काम करीत होती. काही वर्षांपूर्वी देखील आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तडजोडीने निपटारा करण्यात आला होता. मात्र, आरोपीने त्यानंतर पीडितेचा विश्वास संपादन करत तिच्या नावावर 3 लाख रुपयांचे बँकेचे कर्ज घेतले होते. कर्ज परत न केल्यामुळे पीडित महिला आपले पैसे मागण्यासाठी लोमेश्वरच्या फार्महाउसवर गेली होती. त्यावेळी आरोपी लोमेश्वरने बळजबरी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular