Sunday, January 18, 2026
spot_img

भरधाव कारची झाडाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

गोंदिया : भरधाव कारची रस्त्थाच्या कडेवरील बीजाच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू, तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, मंगळवार १ जुलै रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास देवरी-चिचगड मार्गावर परसटोला शिवारात घडली. राजा भारती (वय ३५), सोहेल शेख (वय ३२) असे मृतांची नावे असून सलमान शेख(वय २५) असे गंभीर युवकाचे नाव आहे.

देहरी येथील तीन युवक कार क्रमांक सीजी ०८ आर ६२५५ ने चिचगड वरून देवरीकडे येत होते. परसटोला शिवारातील फॉरेस्ट नाक्याजवळ चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेवरील बीजाच्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात राजा भारती व सोहेल शेख या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मागच्या सिटवर बसलेला सलमान शेख सिटमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाल्याने अपघाताचा आवाज ऐकताच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले. वाहनाचा पूर्णतः चेंदामेंदा झाल्याने गॅस कटरच्या सहाय्याने मृतदेह एवं जखमीला बाहेर काढण्यात आले. यानंतर जखमी युवकाला उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. देवरी पोलिसांकडून घटनेची नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular