Wednesday, January 21, 2026
spot_img

एम.जी. कृषीतंत्र निकेतनच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत घवघवीत यश

गोंदिया : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबई, अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कृषी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम. या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल शनिवार 5 जुलै 2025 ला लागला. यामध्ये एम.जी. कृषीतंत्र निकेतन, मुर्री चौकी, गोंदियाच्या निकाल 97 टक्के लागलेला आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या परिक्षे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी सौ. मयुरी बघेले या विद्यार्थीनीने 81.56 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याच्या पाठोपाठ आदित्य सुखदेवे 80.11 टक्के, कु. तरू भालाधरे 77.56 टक्के, योगेश हिंगे 75.56 टक्के, रत्नमाला पटले 75.33 टक्के गुण घेऊन यश संपादन केलेला आहे. विदर्भात कृषीतंत्र क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. कृषीतंत्र निकेतनला महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरीसाठी निवडले जातात. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय महाविद्यालयाचे संचालक अनील गोंडाणे व पालकांना दिले आहे. या यशासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. रामेश्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीष चैधरी, प्रा. सौरभ बघेले, प्रा. आकाश श्रोते, प्रा. सम्येक गणवीर, राजु रहांगडाले, राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती योगेश्वरी ठवरे व श्रीमती रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular