Monday, April 13, 2026
spot_img

सुकडी ग्रा.पं. कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

गोंदिया : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 18 जुलै रोजी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था एकोडी गोंदिया यांच्या पुढाकाराने तिरोडा तालुक्यातील ग्राम पंचायत सुकडी (डाकराम) कार्यालय येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पुजा अर्चना व माल्यार्पण करून करण्यात आली. महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान आहे. येथील कष्टकरी, मजूर वर्गासाठी त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आहेत. पत्रकारांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरात पोहचवा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े यांनी केले. यावेळी सुकडीचे सरपंच सुनिल मेश्राम, उपसरपंच संदिप कुर्वे, निशाताई वासनिक, दलित सामाजिक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना बिंझाडे, देवेंद्र चौधरी माजी युवा अध्यक्ष NCP तिरोडा, लोकेश राऊत रोजगार सेवक, राजेंद्र मेश्राम, उमेश मेश्राम, सुरेश रायकर ग्राम पंचायत सदस्य, ठाकरे मुख्याध्यापक, महेंद्र मेश्राम, सोनु भोयर, चंद्रशेखर बावनथड़े, विपिन गजभिये, रमेश कापसे, सुनिताताई कोटेकर, प्रगति बिसेन, सदानंद बोपचे, राजेशकुमार तायवाडे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था, उपाध्यक्ष आरिफ़ पठान अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था, सचिव टेकसिंह पुसाम, के.एस. असाठी, पोर्णिमा तायवाडे, मुन्नीबाई ठाकरे, हर्षवर्धन मेश्राम, उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े व संदिप कुर्वे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश रायकर यांनी केले तर आभार आरिफ़ पठान यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular