गोंदिया : जिल्ह्यातून नीट परीक्षेमध्ये प्रथम स्थान मिळवलेल्या विशाखा रहांगडाले हिचा महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळ व श्री संत गजानन महाराज स्मारक संस्थेतर्फे 31 जुलै रोजी गजानन महाराज मंदिर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
गोंदिया येथील महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळ दर वर्षी जिल्ह्यातून नीट परीक्षेत प्रथम येणार्या विद्यार्थिनीचा सत्कार करतो. यंदा या परीक्षेत विशाखा रहांगडाले हिने जिल्ह्यातून प्रथम स्थान पटकावले. गुरूवारी तिचा शहरातील सिव्हिल लाईन येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पद्मनारायण बक्षिस 5001 रुपयाचा धानादेश व प्रशस्तिपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. सुधीर जोशी, प्रकाश उमाळकर, उदय राजनकर, विनोद हिरडे, मंदार भडंग, अभिजीत देशपांडे, प्रसाद बेडेकर, जयंत बापट, शिवराज भांडारकर, रविन्द्र सोनवाने, सुनील एकनाथे, विनायक बहेकार, विजय लंके उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





