Sunday, January 18, 2026
spot_img

जिल्ह्यात कृषि केंद्रांवर अनियमिततेविरुद्ध कारवाई;  2 परवाने रद्द, 7 निलंबित

गोंदिया : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य दराने व दर्जेदार खते मिळावीत, तसेच अनावश्यक लिंकींग रोखण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात 2 ऑगस्टपासून कृषि निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या अनुषंगाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 निरीक्षक व 1 भरारी पथक कार्यरत आहे. तपासणीदरम्यान अनेक कृषि केंद्रांमध्ये ePOS मशीनवरील व प्रत्यक्ष साठ्यात तफावत, साठा नोंदींची अद्ययावत नोंद नसणे, उगम प्रमाणपत्राचा अभाव, परवाना नुतनीकरणाच्या नियमांचे उल्लंघन, दरपत्रक न लावणे, विक्री व साठा रजिस्टरमध्ये विसंगती आढळून आली. या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर 3 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार 2 कृषि केंद्रांचे परवाने रद्द, 7 केंद्रांचे परवाने निलंबित, तर 5 केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

अनधिकृत विक्री केल्यास कठोर कारवाईचा इशारा…
शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिकृत परवानाधारक केंद्रातूनच खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत, असे आवाहन निलेश कानवडे यांनी केले आहे. युरिया, डीएपी व 20:20:0:13 खतांचे MRP दरापेक्षा जास्त दराने विक्री अथवा अन्य निविष्ठांसोबत बंडलिंग केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अशा प्रकरणांबाबत 7499251343 या क्रमांकावर फोन किंवा WhatsApp द्वारे तक्रार नोंदवावी. तसेच, तालुकानिहाय खत उपलब्धतेची माहिती https://fertilizerstockgondia. blogspot.com/ या संकेतस्थळावर किंवा QR कोड स्कॅन करून मिळवता येईल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना : खते खरेदी करताना आपले आधार कार्ड, खरेदी केलेल्या बॅगा व ePOS स्लीपमधील संख्या यांची खातरजमा करावी. तसेच पक्के बिल व स्लीप मिळाल्यानंतरच दुकानातून बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular