Tuesday, March 10, 2026
spot_img

भीषण अपघातात एक जागीच ठार; एक गंभीर, वडेगाव शिवारातील घटना

देवरी (गोंदिया ) : देवरी-आमगाव राज्य मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर झाल्याची घटना दि.०८ ऑगस्ट २०२५ रोज शुक्रवार च्या सायंकाळ अंदाजे ८:०० वाजताच्या दरम्यान देवरी तालुक्यातील ग्राम वडेगाव शिवारात घडली आहे. प्रकाश लक्ष्मण सोनटक्के (वय ३५, रा. आंभोरा ता. देवरी) असे अपघातात मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अमर मेश्राम (वय ३०, रा. आंभोरा) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची नोंद देवरी पोलीस ठाण्यात केली असून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक प्रकाश सोनटक्के तसेच अमर मेश्राम दोन्ही व्यक्ती आंभोरा गावचे रहिवासी असून, दोन्ही तरुण एम.एच. ३५ ए.क्यू. ८४५२ या दुचाकीने गावावरून सकाळीच गोंदियाला काही कामानिमित्त गेले होते. गोंदियातील कामे आटोपल्यानंतर गावाकडे येण्याकरिता असताना, देवरी आमगाव रस्त्यावरील ग्राम वडेगाव शिवारातील वळणदार मार्गावर चारचाकी क्र. एम.एच. ४७ ए.यू.५२७६ ने दुचाकीला जबर धडक दिली. दुचाकी वर स्वार अंभोरा वाशी प्रकाश तसेच अमर यांना गंभीर दुखापत झाली. अपघात स्थळी लोकांची गर्दी जमली. यातूनच दोन्ही तरुणांना गोंदियाला उपचाराकरिता पाठविण्यात आले. परंतु, दुचाकी स्वार प्रकाश सोनटक्के गंभीर जखमी असल्याने वाटेतच याचा मृत्यू झाला. सदर माहिती गावात कळताच, संपूर्ण गाव शोक सागरात बुडालेला आहे.प्रकाश तसेच अमर गावातील होतकरू तरुणांचा दुर्दैवाने झालेल्या अपघाताची माहिती मिळताच, देवरी पंचायत समितीचे माजी सभापती अंबिकाताई बंजार यांनी क्षणाचाही विलंब न करता गरजूच्या मदतीसाठी धावत आले.अपघातात जखमी असलेल्या तरुणांकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथील रुग्णवाहिकेचा आडोसा घेतला. परंतु, देवरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका असूनही, त्यात चालक उपलब्ध नसल्यामुळे खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेत गोंदियाला पाठविले. परंतु, त्यात होत्याचे नव्हतं झालं. गावातील एका होतकरू तरुणाचा मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार गेला. जर रुग्णवाहिका वेळेवर मिळाली असती तर, त्या ही तरुणाचा जीव वाचला असता, अशी खंत माजी सभापती अंबिका बंजार यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular