गोंदिया : येत्या सण उत्सवाच्या निमीत्ताने शहरात कायदा व शातंता व्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने गोंदिया शहर पोलीस ठाणे ॲक्शन मोडवर आले आहे. शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार प्रथम ऊर्फ दहु महेश भोयर(वय २५,रा.कचरा मोहल्ला) याचे विरूध्द असलेल्या ४ गंभीर गुन्ह्याची दखल घेत ३ महिन्याकरीता तडीपार करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी यांनी घेतला आहे.
गोंदिया शहर पोलीस ठाणे व रे.सु.ब. येथे दिवस व रात्र घरफोडी, रेल्वे संपत्ती (अवैध कब्जा) अधिनियम तसेच शिवीगाळ करुन धमकी देवून हत्याराने इच्छापुर्वक दुखापत पोहचविणे या सारखे ४ गंभीर गुन्ह्याची नोंद आरोपीवर आहे. सदर सराईत गुन्हेगाराच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य लोकांचे मनात दहशत निर्माण झालेली होती. आगामी सण-उत्सवाच्या निमीत्ताने गोंदिया शहरात शांतता व सुव्यवस्था राहुन सर्वसामान्य जनतेला भयमुक्त जिवण जगता यावे याकरीता गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी सदर सराईत गुन्हेगार यास गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्हयातुन तडीपार करण्याकरीता कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनीयमान्वये पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने चंद्रभान खंडाईत, उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांनी प्रस्तावाची शहानिशा व चौकशी करून सराईत गुन्हेगार प्रथम ऊर्फ दद्द महेश भोयर यास दिनांक ०६/०८/२०२५ रोजी आदेश काढुन ३ महीन्याकरीता गोंदिया जिल्हयातुन तडीपार केले आहे. सदर सराईत गुन्हेगारास गोंदिया जिल्हयातुन तडीपार करण्याकरीता पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक किशोर पर्वते व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, सतिश शेंडे, दिपक राहांगडाले, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, राकेश बंजारे, सोनु नागपुरे अंमलदार यांनी कारवाई केली आहे. सदर कारवाईची गोंदिया पोलीस ठाणे हद्दीतील सर्वसामान्य जनतेने प्रशंसा करुन गोंदिया शहर पोलीसांचे आभार मानले आहे.





