Sunday, January 18, 2026
spot_img

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार; मगरडोह शिवारातील घटना

परिसरात भीतीचे वातावरण…
देवरी, (गोंदिया) : देवरी तालुक्यातील मगरडोह शिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात एक गाय जागीच ठार केल्याची घटना शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजे दरम्यान घडली. यामुळे मगरडोह रहिवासी हेमराज पुनाराम सलामे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मगरडोह येथील शेतकरी हेमराज पुनाराम सलामे यांच्या गायींवर मगरडोह ते पालांदूर रस्त्यावर अगदी गाव परिसरालगत हाकेच्या अंतरावर गाय चरत असताना, अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात गायीचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, वनविभागाचे अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वाघाने केलेल्या गायीवरील हल्ल्यांमुळे मगरडोह परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत. आपल्या पशुधनाच्या सुरक्षिततेची चिंता त्यांना सतावत आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वाघाला जेरबंद करून किंवा त्याला सुरक्षित ठिकाणी हलवून शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली आहे. वन विभागाने या गंभीर घटनेची दखल घेऊन, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अशा घटनांमध्ये पशुधन गमावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular