Wednesday, January 21, 2026
spot_img

सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; मोहगाव येथील घटना

देवरी, (गोंदिया) : शेतात काम करीत असताना महिलेला सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार, (ता. १८) सकाळी १० वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आलेवाडा हद्दीतील ग्राम मोहगाव येथे घडली. देवीद्रा आनंदराव राऊत (वय ५०, रा. मोहगाव) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे.
सध्या खरीप हंगामातील धान पिकांवरील निंदनाचे कामे सुरु आहेत. देवेंद्रा राऊत ही महिला गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतातील काम करण्यासाठी गेली होती. काम करीत असतानाच तिला पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला. त्या महिलेने शेतात काम करीत असलेल्या मजुरांना ही बाब सांगितली. त्यांनी लगेच याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना तसेच गावकऱ्यांना दिली. कुटुंबीय व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लगेच त्यांच्या शेतावर पोहचत देविंद्रा ला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देवीद्राच्या मृत्यूने मोहगावात गावात शोककळा पसरली आहे. मृत्यू पश्चात पती, दोन मुली, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे. मृतक शेतकरी महिलेच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular