Sunday, January 18, 2026
spot_img

बदला घेण्यासाठी तलवारीने केली हत्या; २४ तासात आरोपी ताब्यात

मृतक विनोद देशमुख याचे मारेकरी गवसले : तीन पथकाच्या माध्यमातून तपास पूर्ण
गोंदिया : आमगाव तालुक्यातील घाटटेमनी येथील विनोद देशमुख याचे मृतदेह लंबाटोला गावशिवारातील जंगल परिसरात आढळले होते. मृतक विनोद देशमुख याच्या डोक्यावर जखमा असल्याने त्याची हत्या करण्यात आली असावी, असे प्राथमिक अंदाज होता. त्यानुसार पोलिसांनी तपासकार्य हाती घेत प्रकरणाचा उलगडा करणे सुरू केले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, रावणवाडी पोलिसांनी तीन पथकाच्या माध्यमातून तपास पूर्ण करून घटनेतील आरोपींचा शोध घेतला. अवघ्या २४ तासात विनोद देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा करीत मारेकर्‍यांना अटक केली. प्रशांत उर्फ लोकेश छनुलाल कावडे (२५) व कामेश चुन्नीलाल कावडे (२८) दोन्ही रा.वॉर्ड क्र.३, गिरोला ता.आमगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बदला घेण्यासाठी तलवारीने विनोद देशमुख याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले.
विनोद देशमुख हा आपल्या फार्म हाऊस येथून निघून रात्री पर्यंत घरी परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. दरम्यान गावाजवळील जंगल भागात २० ऑगस्ट रोजी विनोद देशमुख घाटटेमणी जंगल परिसरात मृत अवस्थेत मिळून आला. त्यास अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी शस्त्राने डोक्यावर मारून गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. या प्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर खून प्रकरण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, गोंदिया गोरख भामरे, यांचे सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांची ३ पथके नेमण्यात आलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुह्याच्या घटनास्थळी अत्यंत तत्परतेने भेट देऊन गुन्ह्याची सखोल माहिती घेत घटना करुन पसार झालेल्या आरोपींची इत्यंभूत माहिती घटनास्थळ परिसरातील लोकांकडून गोळा करून अथक परिश्रम घेवून खुन करणारे आरोपी प्रशांत उर्फ लोकेश छनुलाल कावडे (२५) व कामेश चुन्नीलाल कावडे (२८) दोन्ही रा.वॉर्ड क्र.३, गिरोला ता.आमगाव यांना मौजा कालीमाटी येथून ताब्यात घेण्यात आले. खून प्रकरण गुन्हयाचे अनुषंगाने नमूद आरोपीना सखोल चौकशी विचारपूस केली असता मृतकने साथीदारांसह आरोपी प्रशांत याचे घरी जाऊन त्यास व त्याचे वडिलांना काठ्यांनी मारहाण केली होती याबाबत आमगाव पोलीस स्टेशन ला मृतक विरुद्ध गुन्हा सुद्धा नोंद आहे त्यानंतर मृताकासोबत वाद असल्याने त्यांचे आपसात पटत नव्हते व मृतक विनोद देशमुख हा नेहमी आरोपीतांचे गावात त्याचा वीटभट्टा असल्याने त्या गावात जात होता तेव्हा दोन्ही आरोपीना शिवीगाळ व धमकी देत होता. या कारणावरून दोन्ही आरोपींत्यांनी विनोद देशमुख याचा खून करण्याचा चार ते पाच दिवसापूर्वी कट रचून त्यांनी १९ ऑगस्ट रोजी रात्री २१.०० वाजता सुमारास गिरोला ते मशिनटोला कडे जाणार्‍या डांबरी रोडवर विनोद देशमुख यास थांबवून चेहर्‍यावर लालमिर्ची पावडर टाकून लोखंडी तलवारीने डोक्यावर, पाठीवर, मानेवर मारून जीविनीशी ठार करून त्याचे प्रेत मृतकचेच मोटर सायकल ने बाघ नदी चे किनार्‍याजवळ लंबा टोला गावाचे शिवारात झुडपी जंगलात मोटर सायकलसह टाकून दिले अशी दोन्ही आरोपीतांनी कबुली दिली आहे.

यांची कामगिरी…
पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे दिलेले निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा तत्परतेने शोध घेवून आरोपींना गुन्ह्यात जेरबंद करण्याची कामगीरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम अहेरकर, पोउपनि शरद सैंदाणे, स.फौ.राजेन्द्र मिश्रा, पो.हवा. सुजित हलमारे, संजय चव्हाण, महेश मेहर, सोमेन्द्रसिग तुरकर, दिक्षीतकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, भोजराज बहेकार, हंसराज भांडारकर, संतोष केदार, राकेश इंदुरकर, दुर्गेश पाटील, मपोशी स्मिता तोंडरे, मपोशी कुमुद येरणे, पोहवा. लक्ष्मण बंजार, चापोशी राम खंदारे यांनी कामगिरी बजावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular