गोरेगाव, (गोंदिया) : गोरेगाव येथील वनपरिक्षेत्राधीकारी कार्यालयातंर्गत येणा-या सर्व वनपरिक्षेत्रात पोळा,मार्बद सणात वन्यजीवांची अवैध शिकार होवु नये. ही अवैध शिकार रोखण्यासाठी शुक्रवार (ता २२) वनपरिक्षेत्राधीकारी मनोज गढवे यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी गस्त लावण्यासाठी सज्ज झाले असुन प्रत्येक बीटमध्ये गस्त लावत आहेत. पोळा व मार्बत दिवसी मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांबरोबर वन्यजीवाची शिकार करून मार्बतचा दिवस उत्साहात साजरा करतात.शासनाने वनातील वन्यजीव अवैध शिकार होवु नये त्यात वाढ व्हावी जंगल सुरक्षीत असावा या उद्देशातून प्रत्येक सणात बंदोबस्त तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात येत असते.या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे व वन्यजीव सुरक्षीत राहावे म्हणून वनकर्मचारी तीन दिवस गस्त घालणार आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्राधीकारी मनोज गढवे यांनी माहीती दिली आहे.





