Sunday, January 18, 2026
spot_img

परवानगी न मिळाल्यामुळे कॉलनीवासीयांमध्ये प्रशासना विरोधात रोष

देवरी येथील राष्ट्रसंत कॉलनी रहिवाशांना गणेशोत्सवाची परवानगीची प्रतीक्षा : नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेमुळे संभ्रम
देवरी, (गोंदिया) : राष्ट्रसंत कॉलनी गणेश उत्सव मंडळ प्रभाग क्रमांक एक देवरी जिल्हा गोंदिया च्या मार्फत सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी लेआउट धारकांनी भूमापन क्रमांक 309 /१/ब येथील लेआउट धारकांच्या सामूहिक वापरासाठी राखीव मोकळ्या जागेवर गणेश उत्सव साजरा करण्यासाठी दिनांक 31/07/ 2025 रोजी तहसीलदार देवरी यांना परवानगीसाठी अर्ज केला आहे.त्याबाबतीत पोलीस निरीक्षक देवरी तसेच मुख्याधिकारी नगरपंचायत देवरी यांना सुद्धा लेखी कळवलेले आहे. तरी राष्ट्रसंत कॉलनी गणेश उत्सव मंडळाला परवानगी न मिळाल्यामुळे कॉलनीवासीयां मध्ये प्रशासना विरोधात रोष उफळत आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी 12 ऑगस्ट 2025 ला सदर जागेच्या नावे असणाऱ्या व्यक्तीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पत्र दिले. वास्तविक माहिती काढल्यावर वर्तमान स्थितीत आजही सदर ओपन स्पेस (जागा)सरकार या नावावर आहे. या बाबद पोलीस विभागाला कळवले असता त्यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2025 ला पत्र देऊन अर्ज ऑनलाईन करण्यास सूचित केले. त्या अनुषंगाने त्यादिवशी राष्ट्रसंत गणेशोत्सव मंडळ कडून गणेश उत्सवा साठी ऑनलाइन अर्ज करण्यात आले आणि त्याची माहिती लेखी स्वरुपात पोलीस विभागाला कळविले आहे. तरी नगरपंचायत देवरी यांनी तोंडी राष्ट्रसंत गणेश मंडळाला ना हरकत प्रमाणपत्र देता येणार नाही असे म्हणून टाळाटाळ केली. करिता सर्व राष्ट्रसंत कॉलनी वासी यांनी उत्सवाची परवानगी गणेश उत्सव एक दिवसावर असूनही परवानगी न मिळाल्याने निरास होऊन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक गोंदिया यांना निवेदन देऊन परवानगी न मिळाल्यास दिनांक 28 ऑगस्ट 2025 ला गणेश मूर्तीसह नगरपंचायत समोर मूक आंदोलन करण्याचे अशा इशाराचे निवेदन सादर केले आहे. सदर जागेबाबत अनेक दिवसांपासून वाद-विवाद असून लेआउट धारकांनी याबाबत रीतसर मा. उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे अपील अर्ज दाखल केलेला आहे. वेळेवर न्याय न मिळाल्याने सर्व लेआउट धारक तसेच राष्ट्रसंत कॉलनी वासी यांच्यामध्ये प्रशासना विरोधात असंतोष निर्माण होत आहे. आता प्रशासन राष्ट्रसंत कॉलनी मधील रहिवाशांना गणेश उत्सवाची परवानगी का नाकारत आहे हे लेखी द्यायला नगरपंचायत प्रशासन तयार नसलेली दिसून येत आहे. करिता आताआंदोलना शिवाय पर्याय नसल्याने सामूहिक आंदोलन करण्याच्या मानसिकतेत या कॉलनीतील जनता आहे. या कॉलनीतील लोकांकरीता ओपन स्पेस मध्ये भुमापन क्रं.३०९/०१/ब मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नियोजित जागा आहे.त्या ओपन स्पेसच्या भुमापन क्र.३०९/०१/ब ही जागा ज्यांच्या नावावर आहे.त्या व्यक्तीचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास कळविले आहे. यात नगरपंचायत कार्यालयाने सदर ओपन स्पेस लेआऊट धारक नागरीकांच्या उपयोगासाठी मोकळी करण्याचे आदेशीत केले आहे. यांच्या पत्रावर तहसिलदार यांनी नामे भोजराज शामराव फुंडे राष्ट्रसंत कॉलोनी गणेश उत्सव मंडळ प्रभाग क्र.०१ देवरी यांचे नावाने १२/०८/२०२५ ला सार्वजनिक गणेश उत्सव कार्यक्रम साजरा कराण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे पत्र भोजराज शामराव फुंडे यांना देण्यात आले. परंतू नगरपंचायत ला अर्ज देवुन त्यांच्या कडुन अर्जाची कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक लोकांनी वारंवार नगरपंचायत ला जावुन ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली त्यांना कोणत्याच प्रकारचा पत्र न देता त्यांना मुद्दाम टाळाटाळ केले जात आहे. त्यानंतर तेथील नागरिकांनी ना-हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांनी तहसिलदार, मुख्याधिकारी व पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले. ओपन स्पेस जागेचा निर्णय लागत नाही, तो पर्यंत कोणत्याच पक्षाला त्या ठिकाणी परवानगी देवु नये. जर एका पक्षाला नाही व बाहेरील लोकांना परवानगी देण्याचे काम नगरपंचायत करित असेल तर चुकीच्या या निर्यणामुळे वाद-विवाद निर्माण झाल्यास राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक ले आऊट धारक जबाबदार राहणार नाही. या बाबद नगरपंचायत येथील नगराध्यक्ष व नगर सेविका यांच्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक ले आऊट धारक नगरपंचायत ला काल सोमवार (ता.२५ आगस्ट) रोजी गेले असता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे चर्चा करायला तयार नाही. नेमके काय कारण ? आहे. या बद्दल आम्हाला माहीती द्या हे पण सांगायला तयार नाही. राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक ले आऊट धारकांचे म्हणणे असे आहे की, नगरपंचायत येथील नगराध्यक्ष व नगर सेविका कुणाच्या दबावात तर नाही ना? असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाकडे देवरी शहरवासीयांचे लक्ष लागले आहे, हे विशेष.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular