Sunday, January 18, 2026
spot_img

धारदार शस्त्राने युवकाचा खून; रायपूर गाव शिवारातील घटना

गोंदिया : धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना तालुक्यातील रायपूर गाव शिवारातील रायपूर-सालईटोला मार्गावर मंगळवार २ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हनसलाल भंडारी पाचे (३७) रा. रायपूर ता. जि. गोंदिया असे मृताचे नाव आहे.
मृत हनसलाल हा घरून बाजारात जण्यासाठी निघालेला असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान, रात्री त्याचा मृतदेह रायपूर गावापासून दिड किलोमीटर अंतरावर सालईटोला मार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी हनसलाल याच्या अंगावर धारदार वस्तूने वार केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. विशेष म्हणजे हनसलाल याची दुचाकी ही गावातच मिळून आली असल्याची माहिती आहे. याप्रकरणी संजय घरडे रा. रायपूर यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनात दवनीवाडा पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular