Monday, January 19, 2026
spot_img

भल्या पहाटे घर कोसळले; मोठा अनर्थ टळला, डवकी येथील घटना

■ तात्काळ नुकसान भरपाईची मागणी
देवरी, (गोंदिया) : ऐन पावसाळ्याच्या दिवसात राहते घर कोसळल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. सदरची घटना गुरूवार (ता.११ सप्टेंबर) रोजी पहाटे ४ वाजे दरम्यानची देवरी तालुक्यातील ग्राम डवकी येथील असून, देवराज बाबुराव राऊत (वय ४२) असे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
देवरी तालुक्यातील डवकी येथील शेतकरी देवराज बाबुराव राऊत यांचा शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा आहे. यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शासनाची घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून तुटपुंज्या निधीमध्ये घरकुलाचे बांधकाम पैशाअभावी रखडले आहे. त्यांचा संसार जुन्याच मातीच्या घरात असून अठरा विश्व दारिद्र्य असताना, कुटुंब प्रमुखासह एकूण चार जण वास्तव्यात आहेत.यंदा पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचे मातीचे घर जीर्ण झाल्याने, काल पहाटे ४ वाजे दरम्यान घरातील सदस्य झोपेत असताना, घराचा आतील भाग कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. भर पावसाळ्यात राहते घर खचल्याने सदशेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट उभे झाले आहे. शासनाने तात्काळ घराचा पंचनामा करून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular