Monday, May 25, 2026

गोंदिया ते इंदोर -बंगलोर विमान सेवेचा शुभारंभ; खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांतुन मोठी भरारी

गोदिया : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार प्रफुल पटेल प्रयत्नशील असतात त्यांच्या प्रयत्नांतून विकसित झालेल्या बिरसी विमानतळाच्या अत्याधुनिक सोयी सुविधा व नियमीत हवाई सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने खा.प्रफुल पटेल यांनी इंडिगो विमान सेवेच्या माध्यमातून नियमित गोंदिया ते हैदराबाद सुरू करण्यात आली. याच श्रुखलेत गोंदिया (बिरसी) विमानतळ येथे १६ सप्टेंबर पासून प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून गोंदिया ते इंदोर – बंगलोर स्टार एअरलाइन्स विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

गोंदिया (बिरसी) विमानतळावरून स्टार एअरलाईन्सची विमान सेवा आजपासून मंगळवार, बुधवार व शुक्रवार अशी तीन दिवस बिरसी – इंदोर व बंगलोर अशी राहणार आहे. इंदोर वरून सायंकाळी ५.०० उड्डाण भरून गोंदिया येथे ५.५५ पोहचणार तसेच गोंदिया (बिरसी) विमान तळावरून ६.२५ वाजता इंदोर करीता व इंदोर वरून बंगलोर करीता ०७.५० वाजता उड्डाण भरणार आहे. या विमान सेवेमुळे गोंदिया – मध्यप्रदेश, छत्तीसगड व परिसरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थ्यांना लाभ होवून व्यापाराला चालना मिळणार आहे. शुभारंभ सोहळ्याला माजी आमदार राजेंद्र जैन, स्टार एअर चे गिरीशचंद्र वर्मा, पंकज कांबळे, प्रमोद सोनी और किरण सावळे, दीपक कुमार, सुनील साबळे आदि उपस्थित होते.

लवकरच मुंबई, पुणे, दिल्ली विमानसेवा सुरु होणार
आज गोंदिया ते इंदोर – बंगलोर स्टार एअरलाईन्स विमान सेवेचा शुभारंभ करण्यात आला. व्यापारी व नागरिकांच्या हितासाठी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने भविष्यात गोंदिया (बिरसी) येथून लवकरच मुंबई, पुणे व दिल्ली करीता नियमित विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे असे शुभारंभ प्रसंगी बोलतांना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular