Monday, April 13, 2026
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध : माजी आमदार राजेंद्र जैन

शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
गोंदिया : खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नेहमीच महिलांना व युवा वर्गाला नेतृत्वाची संधी दिली आहे. आगामी गोंदिया नगरपरिषद निवडणुकीत महिला आरक्षणानुसार 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असून प्रत्येक प्रभागात महिला प्रतिनिधींना प्राधान्य देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
गोंदिया शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी जैन कुशल भवन गोंदिया येथे पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, शहर अध्यक्ष माधुरी नासरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र जैन म्हणाले की, शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना, पिंक रिक्षा, तसेच उच्च शिक्षणात मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीचे प्रयत्न सुरू आहे. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतली असून देशाच्या सर्वोच स्थानावर उत्कृष्ठ कार्य करीत आहे असेही त्यांनी सांगितले. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत राजलक्ष्मी तुरकर, माधुरी नासरे, पुष्पलता माने, चेतना पराते, रामेश्वरी वहिले, आशा पाटील, निर्मला मिश्रा, ज्योत्स्ना सहारे यांच्या सह अनेक महिला कार्यकर्त्यांनी शहराच्या विकासात महिला प्रभावी भूमिका बजावू शकतो अशाप्रकारे आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजलक्ष्मी तुरकर, माधुरी नासरे, आशा पाटिल, निर्मला मिश्रा, कुन्दा दोनोडे, चेतना पराते, पुष्पलता माने, नेहा बहेलिया, रुचिता चौहान, संगीता माटे, अनिता चौरिवार, जयश्री गंगभोज, रंजना गंगभोज, संध्या गंगभोज, उषा गंगभोज, श्रद्धा उपवंशी, लीना हेडाउ, सुनीता डहाके, जयश्री शाह, वैशाली कठोके, गौरी उपवंशी, अनिता गुप्ता, प्रीति भोयर, ज्योति भालाधरे, कल्पना बंसोड़, द्रोपदी पांडे, आरजू खान, जयश्री पांडे, फरजाना खान, हसीना शेख, सलमा खान, सुनीता सोनवाने, कौतिका तिड़के, तारा तिड़के, श्यामकला पारधी, अंजू गुप्ता, रीता बिड़वाईकर, लता गुप्ता, लक्ष्मी बिड़वाईकर, भाग्यश्री बावनथड़े, रूपा पराते, सुनीता बारसागड़े, वत्सला शेंडे, निशा वैद्य, लीला बावनथड़े, दर्शना रावते, माया फरकुंडे, कविता फरकुंडे, शिला बेंद्रे, माया लामकासे, रोहिनी रणदिवे, जया रणदिवे, सुनीता भीमटे, दीपा काशिवार, नीता डोहरे, सरला डोहरे, सुनीता गबने, निकिता गबने, वर्षा बैस, कस्तूरबा माटे, माया माटे, सारिका उदापुरे, निर्मला मेश्राम, आरती चूटे, पुष्पा सहारे, वैशाली शेंडे, निकिता सेंगर, ट्विंकल शेन्द्रे, शिला मेंढे, प्रमिला ब्राम्हणकर, कल्पना नागतोड़े, पायल भेलावे, शशि यादव, उमा सिंग, रेखा बेन, सरिता ब्रम्हे, संतोषी तिवारी, शाहिस्ता खान, काजल अग्रवाल, मुस्कान मिर्ज़ा, शमा मिर्जा, कविता मुरकुटे, कविता धोते, मालती नागपुरे, सारिका राउत, पल्लवी राउत, शिल्पा सोनवाने, संध्या गोंडाने, संगीता आम्बेडारे, राधिका कोहड़े, कविता मांडवे, विद्या शेंडे, नेहा धुवारे, आशा डहाके, रश्मि लोनारकर, रजनी कुर्वे, गीता ढोमने, निखत खान, फरीदा खान, नाफिजा खान, राशिदा शेख, फुरसीद खान, यास्मीन खान, वनिता मेश्राम, शोभा भांडारकर, निर्मला गेडाम, माया यादव, वत्सला बावनकर, नेहा भंडारकर, आफरीन शेख, योगिता माटे, बबिता पाटिल, निशा गभने, ज्योति सहारे, मनीषा अवस्थी, रेखा भरने सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular