Tuesday, March 10, 2026
spot_img

आदिवासी गोवारी समाजाच्या लढ्यात आपण पाठीशी : आमदार विनोद अग्रवाल

मरारटोली येथील खिल्या-मुठ्या देवस्थानात गायगोधन कार्यक्रम संपन्न 
गोंदिया : आदिवासी गोवारी समाजाने आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. अनादी काळापासून सुरू असलेला गायगोधन कार्यक्रम दरवर्षी गोवारी समाजाकडून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी गोवारी समाज आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे काम करीत आहे. शासनस्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून समाजाचा लढा सुरू आहे, याची आपल्याला जाणीव असून समाजाच्या लढ्यात आपण सदैव आदिवासी गोवारी समाजाच्या पाठिशी आहोत, असे प्रतिपादन आ.विनोद अग्रवाल यांनी केले.
स्थानिक मरारटोली येथील खिल्यामुठ्या देवस्थानात २२ ऑक्टोबर रोजी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने गायगोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संबोधित करताना आ.विनोद अग्रवाल बोलत होते. कार्यक्रमाला माजी नगरसेवक सचिन शेंडे, सामाजिक कार्यकर्ता माने, आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वयक समितीचे शहर अध्यक्ष डी.टी.चौधरी, गुलाब नेवारे, मुख्य समन्वयक ज्ञानेश्वर राऊत, मोहन शहारे, रतीराम राऊत, सी.ए.आंबेडारे, विवेकदास राऊत, सुरेश शेंद्रे, मीताराम नेवारे, खेमराज शेंद्रे, प्रमोद शहारे विजु भोयर, प्रविण चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी गोवारी समाज बांधवाच्या वतीने गायगोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पारंपरिक पध्दतीने पुजन करून गाय खेळणीचा कार्यक्रम पार पडला. आ.विनोद अग्रवाल यांनी कार्यक्रमात सहभाग घेत पुजन केले. तसेच समाजातील समस्यांवर चर्चा करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मान्यवरांनी समाजातील विविध विषयांवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular