Monday, September 14, 2026
spot_img
spot_img
spot_img

देवरी येथे आदिवासी वर-वधू परिचय मेळावा शनिवारी

देवरी, (गोंदिया) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी व बि. एम. आर.एफ. ट्रायबल राईट्स फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी समाज वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन शनिवार, ६ डिसेंबर रोजी देवरी येथील आफताब मंगल कार्यालय, चिचगड रोड येथे सकाळी १० वाजे पासून करण्यात आले आहे. या कार्यक्रमा बाबद देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद व बि. एम. आर.एफ. ट्रायबल राईट्स फेडरेशन चे संचालक डॉ. सुरेश कुमार पंधरे यांचे वतीने कळविण्यात आले आहे. आदिवासी उप-वर वर-वधू,व पालकांनी याची नोंद घेत जास्तीत जास्त आदिवासी वर-वधू च्या पालकांनी आपल्या मुला मुलींचे नोंद करून वेळेवर उपस्थित राहुन आपला रजिस्ट्रेशन पूर्ण करावा व आपली नोंदणीची सीट पक्की करावी. कारण आपला वर-वधू पाहण्यासाठीची धरपड, पायपीट व खर्च वाचेल जेणेकरून आपली सामाजिक बांधिलकी रंग आणेल व गैरसोय होणार नाही. याची हमी घ्यावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, बि. एम. आर.एफ. ट्रायबल राईट्स फेडरेशनचे संचालक डॉ. सुरेश कुमार पंधरे, डॉ. नामदेव सरोते, मालती किन्नाके, कान्हा कुंजाम, राकेश सोयाम, समाजसेवक शामराव उईके यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular