Saturday, April 18, 2026
spot_img

सिकलसेल मुक्त समाजासाठी ‘पत्रिका’ नाही, तर ‘रक्तपत्रिका’ जुळवणे गरजेचे : डॉ. गोल्हार

सिकलसेल जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
गोंदिया : “लग्नापूर्वी वधू-वरांनी जन्मपत्रिका जुळवण्यापेक्षा सिकलसेलची ‘रक्तपत्रिका’ (Blood Report) जुळवणे भविष्यातील पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असा मोलाचा संदेश गोंदिया जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिला आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ‘सिकलसेल जनजागृती सप्ताहा’ निमित्त त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना हे आवाहन केले आहे.

सिकलसेल अनिमिया हा एक अनुवांशिक रक्ताचा आजार असून विदर्भात आणि विशेषतः गोंदिया जिल्ह्यात याचे प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे विशेष जनजागृती मोहीम राबविली जात आहे. डॉ. गोल्हार यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये सिकलसेलची तपासणी आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. लग्नापूर्वी तपासणी अनिवार्य : सिकलसेल वाहक (Carrier) किंवा पीडित व्यक्तींचे लग्न झाल्यास पुढच्या पिढीमध्ये हा आजार संक्रमित होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी लग्नाआधी युवक-युवतींनी आपली सिकलसेल तपासणी करून घेणे काळाची गरज आहे.
आरोग्य विभागाची तयारी : जिल्हा आरोग्य यंत्रणा सिकलसेल नियंत्रणासाठी सज्ज असून, नागरिकांनी भीती न बाळगता स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. गोल्हार म्हणाले, “आपल्याला जर सिकलसेल मुक्त गोंदिया घडवायचा असेल, तर जनजागृती आणि वेळीच निदान होणे आवश्यक आहे. नागरिकांनी, विशेषतः तरुण वर्गाने या सप्ताहात सहभाग घेऊन आपली तपासणी करून घ्यावी.” आरोग्य विभागाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular