गोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा अग्रणी बँक कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवीदार शिक्षण आणी जागरूकता निधी अर्थात डिफ अंतर्गत आपली पुंजी आपला अधिकार कार्यशाळा घेण्यात आला. सदर कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ११ वाजता यशस्वीपणे संपन्न झाला.
बँकेत तथा अन्य वित्तीय संस्था मध्ये दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिशा निर्देशानुसार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली २९ डिसेंबर रोजी डिफ (Unclaimed Deposit) कॅम्प जिल्हा स्तरावर प्रचार व प्रसिद्धी करीता घेण्यात आले. सदर कॅम्पमध्ये पात्र खातेधारकांनी सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या हक्काची रक्कम सह्व्याज परत मिळविण्याची प्रक्रिया पार पाळली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना जिल्हाधिकारी श्री प्रजीत नायर, यांनी उपस्थित ग्राहकांना डिफ कॅम्पच्या संकल्पनेची माहिती उपस्थित ग्राहकांना दिली. तसेच ग्राहकांना त्यांच्या हक्काची रक्कम परत मिळविण्यासाठी कॅम्पचा फायदा घेण्याचे आव्हान केले. तसेच या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल जिल्हा प्रशाषणाच्या वतीने सर्व बँकांचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी भैया साहेब बहेरे, भारतीय रिजर्व बँक, नागपूरचे प्रबंधक सर्वज्ञ सिंह, श्री अण्णा ठाकरे जिल्हा अग्रणी प्रबंधक बँक ऑफ इंडिया, गोंदिया, अरविंद कुमार प्रबंधक भारतीय स्टेट बँक गोंदिया यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले. कॅम्पला बंकेचे पदाधिकारी, भारतीय आयुर्विमा महामंडळ व म्युच्युअल फंडचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमा दरम्यान ३० पात्र दावेदारांना २२.०१ लाखांचे डिफ दावा बँकाद्वारा संबधित ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात आला. प्रबंधक अण्णा ठाकरे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.





