Wednesday, August 19, 2026
spot_img
spot_img
spot_img

शिक्षिका कु. एम. एच. मेंढे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

सडक अर्जुनी, (गोंदिया) : फुलीचंदजी भगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोसमतोंडी या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कु. एम. एच. मेंढे यांच्या सेवानिवृत्तीपर भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. पी. टेंभुर्णे होते. संस्थेच्या सचिव श्रीमती रितादेवी येळे यांनी भ्रमणध्वनीद्वारे कु. मेंढे मॅडम यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला गौरवपूर्ण अभिवादन केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कु. टी. एस. येडेकर, बी. बी. येळे, टी. आर. झोळे, जी. पी. पटले, एच. टी. बिसेन तसेच भेंडारकर सर , अभिलाषा रहांगडाले उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने कु. एम. एच. मेंढे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत कु. मेंढे मॅडम यांनी विद्यालयाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, विद्यालयाप्रती असलेले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी विद्यालयाला बँड संच भेट दिला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून कु. मेंढे मॅडम यांच्या कर्तव्यनिष्ठ, सेवाभावी आणि विद्यार्थीहितैषी कार्याचा गौरव केला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य, आनंद, समाधान व सुख-समृद्धीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संचालन कु. एन.व्ही. हिवसे यांनी केले तर आभार एम.एस. बडोले यांनी मानले.
शेवटी सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular