Wednesday, April 29, 2026

आमदारांनी केली निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासनाची पूर्ति; ३० कोटी ३३ लाखांच्या विविध रस्ता बांधकामांना सुरुआत

काटी ते बिरसोलामधील ४ किमी अंतर कमी करण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी १.५ किमीचा पर्यायी सिमेंट रस्ता देऊन दोन गावांना दिली भेट..
गोंदिया : निवडणुकीनंतर प्रलंबित असलेली अनेक कामे पूर्ण करण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल वचनबद्धतेने पुढे जात आहेत. निवडणुकीदरम्यान, त्यांनी डांगोर्ली बॅरेज, धानवर बोनस रक्कम प्रति हेक्टेयर 20 हजार रुपये, आवास योजनेअंतर्गत गरजूंना घरे, महत्त्वाचे रस्ते बांधणे, सिंचन व्यवस्था सुधारणे इत्यादी कार्य पूर्ण करण्याचे आश्वसन दिलं होते. परिणामी, आज रु. 395 कोटि किमतीच्या महत्त्वाकांक्षी डांगोर्ली बॅरेजचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि आमदार विनोद अग्रवाल यांनीही धानवर रु. 20 हजार हेक्टरीचा बोनस मिळवण्याचा मान मिळवला आहे. निवडणुकीदरम्यान, नागरिकांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे अनेक रस्त्यांच्या बांधकामाच्या मागण्या केल्या होत्या, ज्या त्यांनी पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले होते. आता ही आश्वासनेही पूर्ण होताना दिसत आहेत. अलिकडेच आमदार विनोद अग्रवाल यांनी ३० कोटी ३३ लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करून ग्रामस्थांच्या समस्या सोडवल्या आहेत. विशेष म्हणजे काटी ते बिरसोलामधील ४ किमी अंतर कमी करण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी १.५ किमीचा सिमेंट रस्ता देऊन दोन गावांना मोठी भेट दिली आहे.

ही कामे सुरू आहेत…
आमदार विनोद अग्रवाल यांनी डांगोर्ली येथे ३० लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम, ग्राउंड फिलिंग आणि सपाटीकरण, ५ कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या ३ किमी लांबीच्या बिरसोला-भादयाटोला रस्त्याचे बांधकाम, १ कोटी रुपये खर्चाच्या १.५ किमी लांबीच्या बिरसोला-सिंगलटोली-काटी रस्त्याचे बांधकाम, १० कोटी ४ लाख रुपये खर्चाच्या ५.७१ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग ५४३ रजेगाव-बघोली-काटी रस्त्याचे बांधकाम, ४ कोटी २३ लाख रुपये खर्चाच्या ५.५१ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग ५४३ रजेगाव-कोचेवाही रस्त्याचे बांधकाम, ३ कोटी १७ लाख रुपये खर्चाच्या ४ किमी लांबीच्या चिरामनटोला-छिपिया रस्त्याचे बांधकाम आणि १२ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या ७.२५ किमी लांबीच्या बनाथर-कोचेवाही-चंगेरा-बाजारटोला रस्त्याचे बांधकाम या कामांचे भूमिपूजन केले.

यांची होती उपस्थिती…
वरील कार्यक्रमादरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांच्यासोबत पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, कृउबास सभापती भाऊराव उके, धनंजय भाऊ तुरकर (कृउबास संचालक), माजी ग्रामीण मंडल अध्यक्ष छत्रपाल तुरकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष चैताली नागपुरे, जिप सभापति दीपा चन्द्रिकापुरे, जि.प.सदस्या आनंदाताई वाढ़िवा, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पंधरे, जिप सदस्या जितेश्वरी रहांगडाले, पंचायत समिती सदस्या मंजुताई डोंगरे, पंचायत समिती सदस्या शैलजा सोनवाणे, काटी मंडळाचे अध्यक्ष संदीप तुरकर, कामठा मंडळाचे अध्यक्ष ललित तावाडे, कुडवा मंडळाचे अध्यक्ष मुकेश लिल्हारे, रजेगांव सरपंच केशरबाई उपवंशी, काटी सरपंच सुषमा उके, ग्यानचंद जमईवार, सुरपत खैरवार, दशरथ पिपरेवार, रमेश नागफासे, जाकीर भाई, पोलीस पाटील दिलीप तुरकर, कुमार बाहे, शिव भोयर, आसिफ खान, रामेश्वर बाहे, मौजीलाल नागफासे, गेंदलाल पनोरे, हन्नूजी दंदरे, ओंकार नागफासे, राजूभाऊ सूर्यवंशी, ओंकार बिजेवार, हेमलता महंत, गंगाबाई पाचे, दुलीचंद पाचे, चोखेलाल दंदरे आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular