Monday, May 25, 2026

शेतातील झाडावर अस्वल, जानाटोला परिसरात खळबळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गोंदिया : जानाटोला परिसरात आज सकाळपासून एकच खळबळ उडाली आहे! कोहमारा रोडवरील पेट्रोल पंपासमोरील भरत दमाहे यांच्या शेतातील एका झाडावर अस्वल बसलेले आढळून आल्याने परिसरात भीती आणि अफवांचा जोरदार फैलाव झाला आहे. अस्वलाचे झाडावर बसून असलेले दृश्य पाहून आजूबाजूच्या गावांतील नागरिक घटनास्थळी धावले. काहींनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले, तर काहींनी थेट सोशल मीडियावर ‘जंगलातील पाहुणा’ असे हॅशटॅग लावत थरारक दृश्ये व्हायरल केली.

जंगलालगत शेती असल्यामुळे वन्य प्राणी गावाच्या हद्दीत आल्याचे हे आणखी एक धक्कादायक उदाहरण मानले जात आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव वनविभाग, पोलीस कर्मचारी व अधिकारी फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असून पोलिसांनी नियंत्रण मिळवले आहे. ग्रामस्थांना शांतता राखण्याचे व अस्वलाच्या दिशेने जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाकडून सध्या अस्वलाला झाडावरून सुरक्षितपणे खाली आणण्याचे (रेस्क्यू) ऑपरेशन सुरू आहे. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, प्राणी पूर्णतः नियंत्रणात असून लवकरच त्याला पकडून जंगलात सोडले जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular