Friday, May 1, 2026

गरजू व पात्र लाभार्थ्यांचा आधारवड ठरतोय अनुलोम : तहसीलदार प्रज्ञाताई भोकरे

गोरेगाव, (गोंदिया) : अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) संस्थेच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. प्रशासन व गरजू पात्र लाभार्थी यांच्यातील दुवा अनुलोम मित्र असून आजघडीला अनुलोम गरजू व पात्र लाभार्थ्यांचा आधारवड ठरत आहे, असे प्रतिपादन तहसीलदार प्रज्ञाताई भोकरे यांनी केले.
गोरगाव पंचायत समिती सभागृहात अनुलोम द्वारे आयोजित 11 ऑगस्ट रोजी शासकीय अधिकारी परिचय व योजना माहिती मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रज्ञाताई भोकरे, आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, कृषी विभागातून पी.एस. रहांगडाले, महिला बालकल्याण विभागातून सावरकर, बांधकाम कामगार विभागातून जांभूळकर अश्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. परिचयासह अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील योजनांची सविस्तर माहिती उपस्थित सर्व अनुलोम मित्रांना दिली. प्रास्ताविक अनुलोम उपविभाग प्रमुख संजय भावे यांनी मांडले. तर संचालन भाग जनसेवक पंकज रहांगडाले यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular