Monday, September 14, 2026
spot_img
spot_img
spot_img

बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त

तुकुम/सायगाव येथील घटना, गावात भीतीचे वातावरण
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मौजा तुकुम (सायगाव) येथे दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट वाघाने गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या फस्त केल्याची घटना घडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव चिंतामण कुमोटी असून त्यांचे अंदाजे विस हजार रुपयाचे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने पंचनामा केला असल्याने तात्काळ आर्थीक नुकसान भरपाईची मागणी पीडित शेतकऱ्याने गोठणगाव वनविभागाकडे केली आहे. तुकुम हे गाव जंगल परिसराला लागून असल्याने गावात नेहमीच जंगली प्राण्यांचा वावर होत असतो. लाल तोंड्या माकडांनी तर तुकुम वासियांना अगदी मेटाकुटीस आणले आहे. लाल तोंड्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी कित्येकदा तोंडी आणि लेखी सूचना सबंधित वन विभागाला दिल्या. मात्र याकडे वनविभागाने त्यांचा बंदोबस्त केला नाही. परिणामी त्या लाल तोंड्या माकडांचा हैदोस सध्या तुकुंम वासियांसाठी चिंतेची बाब बनली आहे. अशातच बिबट वाघाचा वावर दिवसेंदिवस गावात वाढत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे गोठणगाव येथील वनविभागाने तात्काळ त्या बिबट वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular