Thursday, April 30, 2026

अंनिस २०२५ चा राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार अनिल गोंडाने यांना जाहीर

गोंदिया : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष अनिल गोंडाने यांना जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती महा. अनिसच्या मुक्ता दाभोलकर, राहुल धोरात, रामभाऊ डोंगरे यांनी दिली.
यामध्ये अंनिसचे नागपूर जिल्हा पदाधिकारी पुष्पा घोडके, शाखा पदाधिकारी मंगला गाणार, वर्षा सहारे, विजयाताई ठाकरे आणि ग्रंथमित्र पुरस्कार चंद्रशेखर मेश्राम, विजयकांत पाणबुडे शतकवीर पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील शाखेचे अध्यक्ष दिलीप गेडाम तसेच भद्रावती तहसील शाखा कार्याध्यक्ष शारदाताई खोब्रागडे, यांचा सुद्धा समावेश आहे. अंनिसचे हे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा विचार घेऊन समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चिकाटीने करत आहेत. त्यांच्या क्रियाशीलतेमुळे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यामध्ये संघटनेचे काम वाढत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाच्या वाढीसाठी हे कार्यकर्ते सतत प्रयत्नशील असतात. या पुरस्काराचे वितरण लातूर येथे रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी पन्नालाल भाऊ सुराणा (ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ता) यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गणेश चिंचोले, मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, राहुल थोरात उपस्थित असणार आहेत. पुरस्कार प्राप्त कार्यकत्यांचे अभिनंदन रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारी समिती सदस्य, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, विनोद बनसोड, अतुल सतदेवे, अमित उके, के. पी.उके, मनोज बनसोड, पल्लवी रामटेके गोंदिया जिल्ह्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular