Saturday, April 18, 2026
spot_img

गोंदिया ते डोंगरगड ते गोंदिया सायलकल वारी २ फेब्रुवारीला

– जिल्हाधिकारी प्रजीत नायर होणार सहभागी
– ‘एक दिन सायकल के नाम’चा अभिनव संदेश
गोंदिया : गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुप द्वारे ‘एक दिन सायकल के नाम’ या उपक्रम चालवत आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक रविवार सकाळी १५ ते २० किलोमीटर सायकलने सायकल चालवून प्रदूषण मुक्त व निरोगी राहावे व आपले आरोग्य उत्तम ठेवावे असा संदेश देण्यात येत आहे. हाच संदेश छत्तीसगड, मध्येप्रदेश राज्यातही पोहचावा या उद्देशाने छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील माँ बम्लेश्वरी धाम येथे मातृ पितृ दिवसाचे औचित्त साधत २ फेब्रुवारीला गोंदियाहुन ३५ ते ४० युवक-युवती गोंदिया ते डोंगरगड सायकल वारी करणार आहे. माता बम्लेश्वरीचे दर्शन घेऊन सायकल चालवण्याचे संदेश देणार आहे. यावर्षी गोंदियाचे जिल्हाधिकारी हे सुद्धा या सायकल वारीमध्ये सहभाग घेऊन ते सुद्धा स्वतः सायकल चालवणार आहेत. तर २ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजता जयस्थंभ चौक इथून सुरु होणार आहे. या सायकल रॅलीला प्रमोद पंचभाई उपवनसंरक्षक वन विभाग गोंदिया हे हिरवी झेंडी दाखविणार आहे.
दिवसेंदिवस वातावरणात बदल होत, असल्याने ग्लोबल वॉर्मिंग चे संकेत मिळत आहे. याला मुख्य कारण म्हणजे विविध प्रभूषण आहे, या प्रभूषणावर नियंत्रण मिळविण्या साठी गोंदियातील काही युवक युतीनि ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम वर्ष २०१७ पासून हातात घेतले आहे. प्रत्येक आढवाड्याच्या रविवार ला सकाळी १५ ते २० किलोमीटर चालवून प्रदूषण मुक्त व निरोगी राहावे व आपले आरोग्य उत्तम ठेवावे असा संदेश देण्यात येत आहे. वर्ष २०१७ पासून संडे सायकलिंग ग्रुप तयार करण्यात आले असुन या ग्रुप च्या माध्यमातुन ‘एक दिन सायकल के नाम’ हे उपक्रम गोंदिया शहरातून सुरु करण्यात आले. प्रत्येक रविवार ला सकाळी एक ते दीड तास सायकल चालवून शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा सायकल चालवण्याचे का फायदे आहेत असे संदेश देऊन सायकल चालवून आपण आपले आरोग्य उत्तम ठेऊ व प्रभूषण मुक्त करू असे संदेश देण्यात येत आहे. या अभियानातील दोन युवक अमन व शांती, निरोगी आरोग्य, प्रभूषण मुक्त भारत चा संदेश घेऊन तब्बल हजारो किलो मीटरची यात्रा करून बाघा बॉडर जम्मू-काश्मीर पर्यंत सायकल ने पोहचले होते. तर या अभियानाचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून इंधन बचत, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व प्रदूषण मुक्त करण्यासाठी हे उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाला बघून अनेकांनी सायकल चालविण्यास सुरवात केली आहे. असाच उपक्रम लगतच्या राज्यात हि सुरु व्हावा या उद्देशाला मागील चार वर्षा पासुन छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील प्रसिध्द माँ बम्लेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी व हा संदेश हजारो भक्तांच्या माध्यमातून पोहचावा म्हणून या यावर्षी सुद्धा गोंदिया तुन २ फेबुवारी रविवार ला सायकल यात्रा करत डोंगरगड ला पोहचणार आहे. असाच उपक्रम लगतच्या राज्यात हि सुरु व्हावा या उद्देशाला मागील चार वर्षा पासुन छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील प्रसिध्द माँ बम्लेश्वरी चे दर्शन घेण्यासाठी व हा संदेश हजारो भक्तांच्या माध्यमातून पोहचावा म्हणून या यावर्षी सुद्धा गोंदिया तुन २ फेबुवारी रविवार ला सायकल यात्रा करत डोंगरगड ला पोहचणार आहे. या यात्रेची सुरवात गोंदिया च्या जय स्थंभ चौक येथून सकाळी ५ वाजे सुरु होणार असुन आमगाव येथे श्री जीवन गौरव फाउंडेशन आमगाव द्वारे स्वागत करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे सालेकसा या ठिकाणी सुद्धा या यात्रेच्या सायकलिस्ट चा स्वागत सालेकसा पोलीस द्वारा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे दरेकसा येथे दिशा आरोग्य कुटीर द्वारा स्वागत करण्यात येणार आहे. तसेच डोंगरगड येथे वामा सुरक्षा दल द्वारे स्वागत करण्यात येणार आहेत. तर या अभियानात सामील होण्याचे आवाहन तसेच देशाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी व आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या सायकल यात्रे मध्ये इच्छुक युवक-युती यांनी सामील व्हावे.

यांच्याशी संपर्क करा….
इच्छुकांनी या अभियानात सामील होण्यासाठी सायकलिंग ग्रुपच्या या संपर्क क्रमांक 09823574880, 09823953395, 07972172270 वर संपर्क करावे असे आव्हान मंजू कटरे, रवी सपाटे, विजय येडे, जितेंद्र खरवडे, अरुण बंनाटे, अजित शेणमारे, नवीन दहिकर, आशा तिडके, दीपाली वाढई, वैशाली भांडारकर, प्रियंका रत्नाकर, पलक कोठडिया, त्रिवेणी उईके, शिवांगी पानतवणे, निखिल बाहेकार, प्रवीण हालांनी, रोमी गुलाटी, राहुल लधाणी, राहुल बडगे, शुभम भिमटे, सुनिद्र मेश्राम, जीवनी सर, श्रीवास्तव सर, हालानि सर, उमेश माधवानी, कवल गुलाटी, विशाल ठाकूर, दीपक गाडेकर, शुभम भिमटे, उमेश माधवाणी, सुनील कावडे, अंजली उके, पुष्पलता घोडेश्र्वर, सूनिद्र मेश्राम हे सगळे डोंगरगडला सायकल ने जाणारा आहेत तर यांच्याशी संपर्क करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular