Sunday, July 26, 2026

चुलीजवळ बसून अभ्यास करत असलेली विद्यार्थिनी भाजली

देवरी तालुक्यातील मरामजोब येथील घटना
देवरी, (गोंदिया) : देवरी पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या मरामजोब येथील ११ व्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी घरच्याच चुलीजवळ बसून अभ्यास करताना लागलेल्या आगीत गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. चांदणी किशोर शहारे (वय १७) असे आगीत गंभीर झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदणी शहारे ही विद्यार्थिनी शिवराम महाविद्यालय मुरदोली येथील अकराव्या वर्गामध्ये शिकत आहे. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्याकरिता, नेहमीप्रमाणे अभ्यास करण्यासाठी पहाटेच्या दरम्यान उठून घरच्या चुलीजवळ बसून अभ्यास करीत होती. अचानक लागलेल्या आगीत सदर विद्यार्थिनी पूर्णतः जळाली. गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीला ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आले. परंतु सध्या स्थिती गंभीर असल्यामुळे गोंदियाला हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular