गोंदिया : साकोली तालुक्यातील ग्राम सुकळी (महालगाव) येथे खासदार प्रफुल पटेल यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकाकुल परिवाराला सांत्वना दिली. काही दिवसांपूर्वी यांच्या मातोश्री स्व. मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे दुःखद निधन झाले. या निमित्त खासदार प्रफुल पटेल यांनी आज पटोले परिवाराला सांत्वना देत या दुःखद घटनेला सहन करण्याची ईश्वर शक्ति प्रदान करो अशी प्रार्थना केली. यावेळी सर्वश्री नानाभाऊ पटोले, सुनिल फुंडे, विनोद पटोले सहीत परिवारातील सदस्य व अन्य उपस्थित होते.





