Tuesday, August 25, 2026
spot_img
spot_img
spot_img

अस्थिव्यंग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिरात १०० च्या वर मुलांची तपासणी

नागपूर येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. विराज शिंगाडे करणार मोफत ४४ मुलांवर शस्त्रक्रिया
गोंदिया : समग्र शिक्षा च्या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या समावेशीत शिक्षण विभागामार्फत मंगळवार, २५ मार्च २०२५ रोजी जिल्ह्यातील 0 वया गटापासून तर अंगणवाडी तथा इयत्ता १ ली ते १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अस्थिव्यंग मुलांसाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर बाई गंगाबाई रुग्णालयात आयोजित करण्यात आले. शिबिरात 100 च्या वर च्या मुलांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात नागपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. विराज शिंगाडे हे या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग मुलांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्यातच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या मार्गदर्शनात 0 ते 18 वयोगट असलेल्या दिव्यांग मुलांच्या साठी मोफत शस्त्रक्रिया करण्याचा कार्यक्रम विभागाने हाती घेतलेला असून पहिल्या टप्प्यात आज जिल्ह्यातील 100 च्या वर अस्थिव्यंग मुलांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करण्यात आली. या मधील 44 अस्थिव्यंग मुलांची शस्त्रक्रिया ही नागपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्विराज शिंगाडे त्यांच्या हॉस्पिटल मध्ये सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. सदर शिबिर बाई गंगाबाई रुग्णालयात स्थित जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात ठेवण्यात आले असून शिबिरांत आमगाव, अर्जुनी मोर, देवरी, गोंदिया, गोरेगांव, सडक अर्जुनी, सालेकसा व तिरोडा या तालुक्यातील 100 च्या वर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या पैकी 44 अस्थिव्यंग मुलांची शस्त्रक्रिया नागपूर येथे करण्यात येणार आहे तर बाकी अस्थिव्यंग मुलांवर गोंदिया येथेच उपचार करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular